Sunday, December 27, 2009

हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेवर बहिष्कार

Dec 26, 2009

सांगली - डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने पुणे जिल्ह्यात होणाऱ्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच सांगवी (पिंपरी-चिंचवड) येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याच्यासह महाराष्ट्र केसरी सईद चाऊसवर झालेला अन्याय व राजकारणामुळे हा निर्णय घेत असल्याचे त्याने "सकाळ'शी बोलताना सांगितले. त्याच्या या निर्णयामुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment